Whale Fish Last Fall: मरण असावं तर देव माशासारखं... १२,४९० हून अधिक सजीवांना आधार

Anirudha Sankpal

मृत्यूची चाहूल

असे म्हटले जाते की देवमासा स्वतःच्या मृत्यूची चाहूल ओळखू शकतो. त्यामुळेच तो आपल्या निवासापासून शेकडो किलोमीटर दूर निघून जातो.

शेवटची डाईव्ह

आपल्या शरीरात उरलेल्या शेवटच्या शक्तीने तो समुद्राच्या अगदी खोल भागात एक शेवटची डाईव्ह मारतो.

व्हेल फॉल

या घटनेला 'व्हेल फॉल' (Whale Fall) असे म्हणतात. सुरुवातीला, शार्क आणि ईल मासे अनेक दिवस देवमाशाच्या शरीरावर ताव मारतात.

कृमींचे भक्ष

जेव्हा शरीरावर थोडेच मांस उरते, तेव्हा लहान कृमी (Tiny worms) भक्षकांनी मागे सोडलेले सर्वकाही खाऊन टाकतात.

झॉम्बी वर्म्स

त्यानंतर 'झॉम्बी वर्म्स' (Zombie worms) येतात. ते देवमाशाच्या हाडांमध्ये ॲसिड सोडतात, ज्यामुळे हाडे मोडून त्यामधील साठवलेले फॅट्स आणि प्रोटीन्स बाहेर येतात.

सांगाडा वनस्पती वाढीस आधार

सिम्बायोटिक बॅक्टेरिया (Symbiotic bacteria) या पौष्टिक घटकांवर जगतात आणि एकत्र येऊन सांगाड्याभोवती नवीन वनस्पतींच्या वाढीस आधार देतात.

१०० वर्षे चालणारी प्रक्रिया

ही प्रक्रिया जवळपास १०० वर्षे चालते. एका देवमाशाचे शरीर ४३ हून अधिक प्रजातींना आणि १२,४९० हून अधिक सजीवांना आधार देऊ शकते.

एका देवमाशाचे मरण हजारोंचे जीवन

जेव्हा एखादा देवमासा मरण पावतो, तेव्हा तो शेकडो जीवांसाठी जीवन ठरतो. यावरून निसर्गरचनेचे आश्चर्यकारक रूप दिसून येतं.

येथे क्लिक करा