Weird Hippo Mating Habits: हिप्पो मादीला आकर्षित करण्यासाठी करतात एक 'घाणेरडी' कृती

Anirudha Sankpal

अजब वैशिष्ठे

पाण्यात राहणाऱ्या हिप्पोच्या अर्थात पाणघोड्याची अनेक अजब वैशिष्ठे आहेत. मात्र मादीला आकर्षित करताना हिप्पो जे काही करतो ते वाचून तुम्ही नाक मुरडाल.

मादीला आकर्षित करणे

अनेक प्राणी त्यांच्या जातकुळीतील मादीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आवाज काढणे, दुसऱ्या नरासोबत भांडण करणे असे किरकोळ प्रकार करत असतात.

अजब प्रकार

मात्र हिप्पो हा मादीला आकर्षित करण्यासाठी आपल्या शेणाचा अन् शेपटीचा वापर करतो. नर हिप्पो शौच करताना आपली इवलीशी शेटपी पंख्यासारखी गरागरा फिरवतो.

वासावरून कळतं

यामुळे हिप्पोचं शेण आणि मूत्र हे आसपासच्या परिसरात पसरते. याच्या वासावरून मादी हिप्पोला नराचे वय, त्याच्या आरोग्याची माहिती मिळते.

जांभई देणे, दात दाखवणे

हिप्पो मादी हिप्पोला आर्षित करण्यासाठी जांभई देणे, दात दाखवणे यासारखे प्रकार देखील करतो. याद्वारे तो तिचे आणि पिलाचे संरक्षण करण्यासाठी किती किती सक्षम दात हे फ्लेक्स करत असतो.

पाण्यात गुरगुरणे

हिप्पो पाण्यात आवाज काढणे तुषार फवारणे असे देखील प्रकार करतो. पाण्यात असताना नर मोठ्याने गुरगुरतो त्याला Wheeze-Honk असे देखील म्हणतात.

हिप्पो असले पाण्यातील चाळे मादीला आकर्षित करण्यासाठी आणि तिचे लक्ष वेधण्यासाठी करतो. जणू काही तो एक प्रकारे शिळ घालत असतो.

भांडण तर होणारच

मादीचा विषय आलाय अन् भांडण होणार नाही असं कसं होईल... हिप्पोला देखील आपली मादी मिळवण्यासाठी दुसऱ्या नर हिप्पोला फिल्मी स्टाईलने लोळवावं लागतंच.

मिलनाची प्रक्रिया पाण्यातच

जो जिता वही सिकंदर म्हणतात ना तसं या भांडणात जो जिंकते तो इलाक्याचा अन् त्यातील मादीचा देखील सिकंदर होतो. नर मादी हिप्पोची मिलनाची प्रक्रिया पाण्यात पार पडते.

येथे क्लिक करा