पुढारी वृत्तसेवा
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण काय खातोय याकडे आपलं लक्ष नसतं. त्यामुळे अनेक न दिसणारे आजार होण्याची शक्यता दाट असते
किचनमधील एक पदार्थ देखील वजन वाढीसाठी कारणीभूत ठरु शकतो
साखर आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनली आहे. सकाळी आपण पितो त्या चहा कॉफीपासून ते रात्री खातो त्या गोड पदार्थांपर्यंत सर्व काही गोड असते
किचनमधील साखरेचा वापर बंद केल्यास रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते आणि चरबी वेगाने घटते
त्यामुळे वजन कमी करण्याचा सर्वात सोपा फॉर्म्युला म्हणजे तुमच्या आहारातून 'साखर' हा पदार्थ वर्षभर पूर्णपणे टाळा
दिवसभरात पुरेसे पाणी प्या, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होईल
जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते
मैद्याचे पदार्थ आणि पांढरा भात खाणे टाळून आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा
पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली हे देखील नैसर्गिकरीत्या वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे