Morning Weight Loss tips | रोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने झपाट्याने कमी होते वजन

स्वालिया न. शिकलगार

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात? मग सकाळची सुरुवात करा अशा उपायांनी.

Weight Loss | file photo

ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस, एक चमचा मध मिसळून सकाळी प्या.

शरीरातील चयापचय वाढून चरबी वेगाने घटण्यास मदत होते.

रात्री एक चमचा जिरे पाण्यात भिजत ठेवून सकाळी हे पाणी थोडे उकळून प्या.

यामुळे पचनक्रिया सुधारते व अतिरिक्त चरबी कमी करण्यास गुणकारी ठरते.

Belly fat loss | Pinterest

रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजत घालून रिकाम्या पोटी चावून खा.

शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

बडिशोप उकळून तयार केलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या

यामुळे वजन नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळते

पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. दिवसभर भरपूर पाणी देखील प्या.

Kaumudini | चांदण्यासारख्या पांढऱ्याशुभ्र फुलांची ही वनस्पती घरात ठेवल्याने काय होते?