पुढारी वृत्तसेवा
वजन कमी करायचे असेल तर “जीम” की “चालणे” हा प्रश्न अनेकांना पडतो. दोन्हीही प्रभावी उपाय आहेत, पण त्यांचा परिणाम, वेग आणि टिकाऊपणा वेगळा असतो.
तुमच्या शरीराची स्थिती, वय, वेळ आणि उद्दिष्ट यावर योग्य पर्याय ठरतो. चालणे हा वजन कमी करण्याचा सर्वात सुरक्षित आणि सहज करता येणारा व्यायाम आहे
चालण्यामुळे सांध्यावर कमी दबाव, कुठेही, कधीही करता येतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो
साधारण 30–45 मिनिटे वेगाने चालल्यास 150–250 कॅलरी खर्च होतात, वजन कमी होण्याचा वेग तुलनेने कमी असतो, फॅट लॉस साठी वेळ जास्त लागतो
जीम केल्याने जलद फॅट लॉस होतात, मसल बिल्ड होतात, बॉडी टोन सुधारते, मेटाबॉलिझम वाढतो, बॉडी शेप सुधारतो
जीममध्ये cardio + strength training दोन्ही करता येतात, 1 तास जिम वर्कआऊट केल्यास 300–600 कॅलरी जळतात, स्ट्रेंन्थ ट्रेनिंग नंतरही शरीर कॅलरी जाळते
जीम लावणे खर्चिक असून सुरुवातीला मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरते, नियमितता नसेल तर फायदा कमी मिळतो
चालणे हा सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय आहे, तर जीम हा जलद आणि अधिक परिणामकारक पर्याय आहे
पण खरं वजन कमी होणे हे फक्त व्यायामावर नाही, तर आहार, नियमितता, जीवनशैली यावर जास्त अवलंबून असते.