पुढारी वृत्तसेवा
शेंगदाणे आणि बदाम हे दोन्हीही अत्यंत पौष्टिक खाद्यपदार्थ आहेत. मात्र “सर्वाधिक पोषक कोण?” याचे उत्तर तुमच्या गरजांवर अवलंबून असते
काही बाबतीत बदाम पुढे असतात, तर काही बाबतीत शेंगदाणे अधिक फायदेशीर ठरतात. प्रति १०० ग्रॅम अंदाजे पोषणमूल्य खालीलप्रमाणे
शेंगदाणे कॅलरीज ५६७, तर बदामात ५७९, शेंगदाण प्रथिने -२५ ग्रॅम, बदाम २१ ग्रॅम, शेंगदाणे फॅट- ४९ ग्रॅम, बदामात ५० ग्रॅम, शेंगदाण्यात फायबर ८ ग्रॅम, तर बदामात १२ ग्रॅम असते
शेंगदाण्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन कमी, तर बदामात जास्त प्रमाणात आढळून येते
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. त्यामुळे स्नायू वाढ, शरीराची ताकद आणि ऊर्जा टिकवण्यासाठी उपयोगी ठरतात
बदामांच्या तुलनेत शेंगदाणे खूप स्वस्त असतात. यातील हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रणास मदत करतात
बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. स्मरणशक्ती व मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त मानले जातात
कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियममुळे हाडांना फायदा होतो. व्हिटॅमिन ई मुळे त्वचेची चमक आणि केसांचे आरोग्य सुधारते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते
शेंगदाणे हे “गरीबांचे बदाम” म्हणून ओळखले जातात आणि प्रथिनांसाठी उत्तम आहेत. तर बदाम हे व्हिटॅमिन ई, मेंदूचे आरोग्य आणि उच्च दर्जाच्या पोषणासाठी उपयुक्त आहे.