Weight Loss Diet Tips : वजन कमी करायचंय? या 8 फळांचा डाएटमध्ये करा समावेश!

पुढारी वृत्तसेवा

आहारात फळांचा समावेश केल्यास नैसर्गिकरीत्या भूक नियंत्रित राहते. वजन कमी करण्यास प्रभावी मदत होते. जाणून घेवूया वजन कमी करण्‍यास उपयुक्‍त फळे.

कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असलेले सफरचंद वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे फळ भूक नियंत्रित करण्यास मदत करते.

कलिंगड हे वजन कमी करण्‍यांसाठी एक उत्तम पर्याय आहे, कारण या फळात वजनाच्या ९०% भाग पाणी असते.

बेरी ही फळांची एक श्रेणी आहे. लहान, रसाळ आणि साधारणपणे पातळ सोलाची फळे बेरी गटात येतात. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात विविध प्रकारच्या बेरींचा समावेश केलाच पाहिजे.

पेरू हे फळ पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. हे फळ बराच वेळ पोट भरल्यासारखे ठेवतो. इतर काही फळांच्या तुलनेत त्यात साखरेचे प्रमाण खूप कमी असते.

संत्र्यामध्ये कॅलरीज कमी, व्हिटॅमिन सी आणि फायबर जास्त असते.

पिअरमध्‍ये फायबरचा चांगला स्रोत, पोट भरलेले ठेवते.

पपईमुळे पचनक्रिया सुधारते आणि नैसर्गिकरित्या गोड असूनही त्यात कॅलरीज कमी असतात.

येथे क्‍लिक करा.