पुढारी वृत्तसेवा
बदलत्या जीवनशैलीत तासनतास जिममध्ये घाम गाळणे सर्वांनाच शक्य नसते.
आता एका नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे की, दररोज केवळ पाच मिनिटे वेगाने चालणे, पुरेशी झोप आणि आहारात थोडा बदल केल्यास आयुष्याची मर्यादा लक्षणीयरीत्या वाढू शकते.
'लॅन्सेट'च्या (The Lancet) 'ई-क्लिनिकल मेडिसिन' या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
संशोधनानुसार, कमी झोप, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार असणर्या व्यक्तींनी दररोजच्या झोपेच्या कालावधीत ५ मिनिटे , वेगाने चालण्यात २ मिनिटे वाढ केली आणि आहारात अर्धी वाटी भाज्यांचा समावेश केला, तर त्यांच्या आयुष्यात एका वर्षाची भर पडू शकते.
लंडन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि चिली येथील आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने हा अभ्यास केला आहे.
दररोज ३० मिनिटांचा आळस झटकून शारीरिक हालचाल केल्यास मृत्यूचा धोका ७ टक्क्यांनी कमी होतो, तर एक तास हालचाल केल्यास हा धोका १३ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
संशोधकांनी स्पष्ट केले की, झोप, व्यायाम आणि आहार या तिन्ही गोष्टींमध्ये एकत्रितपणे केलेले छोटे बदल हे स्वतंत्रपणे केलेल्या मोठ्या बदलांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात.
"संशोधकांच्या मते, जर तुम्ही चांगला आहार आणि व्यायाम करत असाल, तर रोज फक्त ५ मिनिटे जास्त झोपूनही तुमचे आयुष्य वाढू शकते. अन्यथा, तेवढ्याच फायद्यासाठी तुम्हाला रोज २५ मिनिटे जादा झोपावे लागेल."