वयाची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर 'या' गोष्टी करणं टाळा, अन्यथा होईल 'हा' परिणाम

मोनिका क्षीरसागर

वयाची ३० उलटली की रात्री उशिरा जड जेवण केल्याने पचनक्रिया मंदावते आणि चरबी वाढते.

चहा, कॉफी किंवा गोड पदार्थांमधून अतिरिक्त साखर घेणे बंद करा; यामुळे पोटाचा घेरा झपाट्याने वाढतो.

७-८ तासांची झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे भूक जास्त लागते आणि वजन वाढते.

तासनतास खुर्चीत बसून काम करणे टाळा. दर तासाला किमान ५ मिनिटे चालावे.

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास विषारी द्रव्ये बाहेर पडत नाहीत, परिणामी शरीरात सूज आणि वजन वाढते.

पॅकेटमधील वेफर्स, बिस्किटे किंवा मैद्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.

वजन कमी करण्याच्या नादात सकाळी न जेवणे चुकीचे आहे; यामुळे दिवसभर भूक लागते आणि तुम्ही जास्त कॅलरी खाता.

वयाच्या ३० शी नंतर वाढता मानसिक तणाव शरीरातील 'कोर्टिसोल' हार्मोन वाढवतो, ज्यामुळे शरीरावर चरबी जमा होऊ लागते.

येथे क्लिक करा...