stress relief remedies | अशांत मन ५ मिनिटांत होईल शांत; फॉलो करा 'या' ५ सोप्या सवयी!

पुढारी वृत्तसेवा

मानसिक आरोग्‍यासाठी मॉर्निंग रुटीन, सोशल मीडियाचा त्याग, वर्कआउट, झोपण्याचे वेळापत्रक असे सर्वकाही एकाच वेळी करण्याचे सुचवले जाते.

संशोधन असे सांगते की, दीर्घकाळ टिकणारे बदल हे कोणत्याही मोठ्या बदलापेक्षा लहान आणि वारंवार केल्या जाणाऱ्या कृतींमुळे घडतात.

नियमितपणे केलेल्या लहान-लहान गोष्टी तुमच्या भावनांना सकारात्मक आकार देऊ शकतात.

५ मिनिटांपेक्षा कमी वेळ घेणाऱ्या पुढील पाच सवयींपैकी एक सवय जरी फॉलो केली तर शांत मन शांत होण्‍यास मदत होईल.

जेव्हा मन अस्वस्थ असते, तेव्हा विचार कागदावर उतरवा. विचार कागदावर व्‍यक्‍त झाल्‍यास तुमची मज्जासंस्था (Nervous System) शांत होण्यास मदत होते.

मूड सुधारण्याचा जलद मार्ग म्हणजे शरीराची हालचाल. थोड्या वेळ केलेली शारीरिक हालचाल डोपामाइन व सेरोटोनिन सारखे मूड सुधारणारे न्यूरोट्रांसमीटर रिलीज करते.

तुमच्या कम्फर्ट रिलॅक्सिंग सवयींकडे परत जा. आवडे संगीत ऐका किंवा आवडत्या पुस्तकाचे एखादे पान वाचा. या लहान गोष्टी मज्जासंस्थेला शांत करतात.

डोळ्यांसमोर असलेला पसारा नकळत मानसिक ताण वाढू शकतो. काही मिनिटं पसारा आवारला तरी मन शांत होण्‍यास मदत होते.

मानसिक आरोग्यासाठी लोकांशी जोडले जाणे किंवा प्राण्‍यांशी खेळणे खूप फायदेशीर असते.

मनशांतीसाठी या सूक्ष्म सवयी सातत्य हेच दीर्घकालीन परिणाम घडवून आणते. या सोप्‍या गोष्‍टी तुमच्या आयुष्याचा मुख्य आधार बनू शकतात.

येथे क्‍लिक करा.