पुढारी वृत्तसेवा
झोपेचा आरोग्यावरील परिणामाच्या अभ्यासासाठी संशोधकांच्या एकाआंतरराष्ट्रीय गटाने युके बायोबँक मधील सुमारे ५ लाख सहभागी लोकांच्या डेटाचे विश्लेषण केले.
या संशोधनासाठी पथकाने “बायोलॉजिकल एजिंग क्लॉक्स” चा वापर केला.
या संशोधनात संशोधकांना 'U' आकाराचा एक पॅटर्न वारंवार पाहायला मिळाला. ज्यांची झोप मध्यम स्वरूपाची (६ ते ८ तास) होती, त्यांचे आरोग्य सर्वात चांगले होते.
जे लोक नियमितपणे सहा तासांपेक्षा कमी किंवा आठ तासांपेक्षा जास्त झोपायचे, त्यांच्या शरीरामध्ये वेगाने वृद्धत्व वाढण्याची लक्षणे दिसून आली.
सहा तासांपेक्षा कमी किंवा आठ तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्या लोकांमध्ये जैविक वृद्धत्व अधिक गतीने होत असल्याचे दिसून आले.
कमी किंवा जास्त झोपेचा हा परिणाम मेंदू, फुफ्फुसे, यकृत, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा आणि चयापचय या सर्व अवयवांवर स्पष्टपणे दिसून आला.
इतर अनेक अभ्यासांप्रमाणेच, या अभ्यासातही कमी झोपेचा थेट संबंध मेंदूशी संबंधित आजार उदासीनता आणि चिंता यांच्याशी मोठ्या प्रमाणावर आढळून आला.
कमी झोप घेण्याचा संबंध हृदयविकार, टाईप २ मधुमेह, लठ्ठपणा, दम्यासारखे श्वसनाचे विकार, पचनाच्या समस्यां संबंधित असल्याचे आढळले.
संशोधकांच्या मते, जास्त झोपणे हे थेट हानी पोहोचवण्याऐवजी शरीरातील एखाद्या सुप्त किंवा अंतर्गत आजाराचे लक्षण असू शकते.