Anirudha Sankpal
काही व्यक्तींना 'आय लव्ह यू' म्हणायला जड जाते, पण त्या आपल्या कृतीमधून खोलवर असलेले प्रेम सहजपणे व्यक्त करतात.
आपण एकेकाळी आवडीने सांगितलेली एखादी साधी गोष्ट ते अनेक दिवसांनीही लक्षात ठेवतात, ज्यावरून ते आपल्याकडे किती लक्ष देतात हे दिसून येते.
आपला दिवस वाईट गेला असेल तर न सांगताच ते आपल्या शांत करतात. उगाच आरडा ओरडा न करता आपुलकीने विचारपूस करतात.
कामाचा कितीही ताण किंवा बिझी वेळापत्रक असले, तरी ते आपल्यासाठी फोन कॉल्स किंवा कॉफीच्या निमित्ताने न सांगता आवर्जून वेळ काढतात.
आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो किंवा कशाची भीती वाटते, हे ते लक्षात ठेवतात आणि कधीही जाणूनबुजून त्या गोष्टींचा वापर आपल्याविरुद्ध करत नाहीत.
सर्व काही सुरळीत असताना प्रेम दाखवणे सोपे असते, पण आपण ताणतणावात किंवा अडचणीत असताना ते आपल्याला सोडून जात नाहीत. ते एकप्रकारे तुम्हाला आय लव्ह यूच म्हणत असतात
तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकत नसतील, तरीही परिस्थिती कठीण झाली म्हणून ते कधीही गायब होत नाही. तो खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहतात.
मोठ्यानं ओरडून सांगितलं म्हणजे प्रेम असतं असं नाही, तर ते रोजच्या अगदी साध्या कृतीत दडलेले असते जे शांतपणे पाहिल्यावरच समजते.