Brain Reset Tips: मानसिक थकवा आलाय... मेंदू रिसेट करण्याच्या साध्या सोप्या टिप्स

Anirudha Sankpal

स्क्रीन टाइम टाळा

थकवा आल्यावर मोबाईल स्क्रीन, व्हिडिओ आणि नोटिफिकेशन्समुळे मेंदूला विश्रांती न मिळता उलट जास्त ताण येतो.

शांतपणे चालायला जा

फोन किंवा पॉडकास्टशिवाय १० ते २० मिनिटांचे चालणे तुमच्या मेंदूची एकाग्रता पुन्हा मिळवून देण्यास मदत करते.

Walking Benefits | file photo

जागा बदला

एकाच ठिकाणी बसून राहिल्याने अपूर्ण कामांचा ताण राहतो, त्यामुळे शांत खोलीत किंवा बाहेर गेल्याने मेंदूला फ्रेश वाटते.

सोपी शारीरिक कामे करा

स्वयंपाक, आंघोळ, स्ट्रेचिंग किंवा कपड्यांच्या घड्या घालणे यांसारख्या सोप्या कामांमुळे मेंदूवर मोठा निर्णय घेण्याचा ताण येत नाही.

अपूर्ण कामे लिहून ठेवा

अर्धवट राहिलेली कामे कागदावर लिहून ठेवल्याने मेंदूला ती सतत आठवत राहण्याचा ताण कमी होतो.

वेळेवर झोप घ्या

थकवा आल्यावर रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टाळा, कारण अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी मूड आणि निर्णय क्षमतेवर वाईट परिणाम होतो.

Better Sleep Tips | File Photo

कमी स्टिम्युलेशन (Less Stimulation)

मानसिक थकवा दूर करण्यासाठी मेंदूला अतिरिक्त प्रेरणेपेक्षा (Motivation) कमी स्टिम्युलेशनची गरज असते.

Brain Health | file photo

मेंदूला विश्रांती द्या

दिवसभराच्या थकव्यानंतर मेंदूला फ्रेश ठेवण्यासाठी जास्त विचारांपेक्षा मानसिक शांतता आणि विश्रांती सर्वात महत्त्वाची आहे.

Brain Performance | pudhari photo
येथे क्लिक करा