कलिंगडाच्या पांढऱ्या भागात दडलंय आरोग्याचं गुपित; BP अन् पचनासाठी ठरते वरदान

पुढारी वृत्तसेवा

पोषक तत्वांचा खजिना: कलिंगडाचा पांढरा भाग (Rind) हा केवळ टाकाऊ पदार्थ नसून त्यात व्हिटॅमिन सी, ए आणि फायबरचे भरपूर प्रमाण असते.

रक्तदाब नियंत्रित ठेवते: यामध्ये 'सिट्रुलाइन' (Citrulline) नावाचे अमिनो ॲसिड असते, जे रक्तवाहिन्या शिथिल करून ब्लड प्रेशर (BP) कमी करण्यास मदत करते.

BP | Canva

पचनशक्ती सुधारते: पांढऱ्या भागात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचनक्रिया अधिक सुधारते.

canva photo

हृदयासाठी फायदेशीर: रक्ताभिसरण सुरळीत ठेवल्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका टळतो.

Heart | (Canva Photo)

प्रतिकारशक्ती वाढवते: व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे वारंवार होणाऱ्या संसर्गापासून बचाव होतो.

स्नायूंचे दुखणे कमी करते: व्यायामानंतर होणारा स्नायूंचा थकवा आणि जळजळ कमी करण्यासाठी कलिंगडाचा पांढरा भाग अत्यंत गुणकारी ठरतो.

त्वचेसाठी वरदान: यातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेटेड ठेवतात आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्या रोखण्यास मदत करतात.

असा करा वापर: तुम्ही या भागाचा ज्यूस बनवू शकता, कोशिंबीरमध्ये वापरू शकता किंवा त्याची चविष्ट भाजीदेखील बनवू शकता.

येथे क्लिक करा...