Summer skin care tips | सनबर्न अन् टॅनिंगवर रामबाण उपाय; 'या' फळाच्या सालीचा वापर असा करा

पुढारी वृत्तसेवा

उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल किंवा सनबर्न झाला असेल, तर संत्र्याची साल अतिशय गुणकारी ठरते.

संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करते.

सर्वात आधी संत्र्याच्या साली उन्हात वाळवून त्याची बारीक पावडर तयार करून घ्या.

सनबर्न घालवण्यासाठी १ चमचा संत्र्याची साल पावडर आणि त्यात थोडे दही मिसळून पेस्ट तयार करा.

ही पेस्ट प्रभावित त्वचेवर लावून १५ ते २० मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

जर त्वचा जास्त तेलकट असेल, तर संत्र्याच्या पावडरमध्ये दह्याऐवजी गुलाबजेल वापरणे फायदेशीर ठरते.

या उपायामुळे त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातात आणि टॅनिंग वेगाने कमी होण्यास मदत होते.

चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून दोनदा हा घरगुती फेसपॅक नक्की वापरून पहा.

येथे क्लिक करा...