पुढारी वृत्तसेवा
'वॉटरफिल्टरगुरु' कंपनीच्या अभ्यासात दावा करण्यात आला की, न धुतलेल्या पाण्याच्या बाटलीत कमोड सीटपेक्षा ४०,००० पट अधिक बॅक्टेरिया असू शकतात!
अमेरिकेतील 'परड्यू' विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, १५ टक्के लोक बाटलीतील शिळे पाणी न फेकता तसेच पितात; तर केवळ ४२ टक्के लोकच रोज बाटली धुतात!
पाण्याच्या बाटलीमध्ये किचन सिंकपेक्षा २ पट आणि कॉम्प्युटरच्या माउसपेक्षा ४ पट जास्त जंतूंचा वावर असतो.
संशोधनानुसार, बाटली नियमित स्वच्छ न केल्यास, यातील सूक्ष्मजीव केवळ २४ तासांत ७५ हजारांवरून थेट २० लाख प्रति मिलिलिटर एवढ्या वेगाने वाढतात.
बाटलीला तोंड लावून पाणी पिल्याने किंवा अस्वच्छ हातांनी झाकण उघडल्याने लाळेतील व त्वचेवरील जंतू बाटलीत प्रवेश करतात.
या घातक बॅक्टेरियांमुळे पोटाचे विकार, मळमळ, उलट्या, डोकेदुखी किंवा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.
बाटली केवळ पाण्याने विसळू नका! रोज रात्री बाटली डिशवॉश जेल (साबण) आणि विशेष 'ब्रश' वापरून आतील बाजूने घासून स्वच्छ करा.
आपली पाण्याची बाटली इतरांना शेअर करू नका. तज्ज्ञांच्या मते, काचेच्या बाटल्यांमध्ये प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियमच्या तुलनेत कमी जंतू आढळतात.
आजारपणापासून लांब राहण्यासाठी पाण्याची बाटली रोज एकदा धुवा आणि आठवड्यातून किमान एकदा गरम पाण्याने निर्जंतुक करायला विसरू नका!