Cholesterol Test Accuracy : तुमची कोलेस्टेरॉल चाचणी चुकीची तर नाही ना? नवीन रिसर्च काय सांगतो?

पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी लाखो लोक हृदयाच्या आरोग्यासाठी 'लिपिड प्रोफाईल' म्हणजेच नेहमीची कोलेस्टेरॉल चाचणी करतात.

या नेहमीच्या चाचणीत प्रामुख्याने 'LDL' म्हणजेच 'बॅड कोलेस्टेरॉल'चे प्रमाण मोजले जाते.

पण नवीन संशोधनानुसार, केवळ नेहमीची LDL चाचणी हृदयविकाराचा खरा धोका ओळखण्यासाठी पुरेशी नाही!

'JAMA' जर्नलनुसार, 'apoB' (अपोलिपोप्रोटीन बी) ही रक्तचाचणी हृदयविकाराचा लपलेला धोका अचूक ओळखू शकते.

नेहमीची चाचणी कोलेस्टेरॉलचे प्रमाण मोजते, तर 'apoB' चाचणी रक्तातील घातक कणांची (Particles) थेट संख्या मोजते.

LDL प्रमाण सामान्य असूनही रक्तात घातक कणांची संख्या जास्त असू शकते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

मधुमेह, लठ्ठपणा आणि हाय ट्रायग्लिसराईड्स असलेल्या रुग्णांसाठी apoB ही रक्तातील एका विशिष्ट प्रकारच्या प्रथिनाची (Protein) पातळी मोजणारी चाचणी आहे.

संशोधकांच्‍या मते, 'apoB' चाचणीच्या मदतीने वेळेवर योग्य उपचार सुरू करून हजारो लोकांचे प्राण वाचवता येतील.

'apoB' ही नेहमीच्या कोलेस्टेरॉल चाचणीला पर्याय नसून, हृदयाच्या सुरक्षिततेसाठी एक अतिरिक्त आणि उत्तम माध्यम आहे.

येथे क्‍लिक करा.