पुढारी वृत्तसेवा
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याम मध घालून प्यायल्याने शरीराला अनेक मोठे फायदे मिळतात.
मध हे 'प्रीबायोटिक'सारखे काम करते, ज्यामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते आणि पचन संस्था निरोगी राहते.
कोमट पाणी पोटातील एन्झाइम्सना (पाचक रस) सक्रिय करते. यामुळे पोट फुगण्याचा त्रास कमी होतो आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
मधामध्ये जंतूनाशक (Antimicrobial) आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीराचे बाहेरील आजारांपासून संरक्षण करतात आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त साखरेपेक्षा मधामध्ये कमी 'ग्लायसेमिक इंडेक्स' असतो. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
दिवसभर ऊर्जा मिळते मधातील नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज आणि ग्लुकोज) शरीराला थकवा जाणवू देत नाही. व्यायामाआधी किंवा सकाळी हे प्यायल्याने शरीरात उत्साह टिकून राहतो.
हृदयाचे आरोग्य यातील घटक रक्तवाहिन्यांचे नुकसान टाळतात. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास आणि सूज कमी होण्यास मदत होऊन हृदय निरोगी राहते.
चमकदार त्वचा मध शरीरातील विषारी घटक बाहेर काढते, ज्यामुळे मुरुमांचा त्रास कमी होतो. तसेच त्वचेतील ओलावा टिकवून राहिल्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.
टीप : वरील इंटरनेटवरील माहितीवर आधारित असून, ती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.