पुढारी वृत्तसेवा
अनेकांना वाटते झोप म्हणजे फक्त शरीर शांत होणे. पण प्रत्यक्षात, तुम्ही गाढ झोपेत असताना तुमचे शरीर आणि मन अनेक महत्त्वाची कामे करत असते.
झोपेत घडणाऱ्या या गोष्टी ऐकायला विचित्र वाटतील, पण त्या विज्ञानाने सिद्ध केल्या आहेत. चला तर मग, शरीराच्या या ६ बदलाविषयी जाणून घेऊया.
स्वप्न पाहताना आपला मेंदू स्नायूंना काही काळासाठी हालचाल करण्यापासून रोखतो. जेणेकरून स्वप्नात धावताना किंवा करताना तुम्ही प्रत्यक्षात बेडवरून खाली पडू नये किंवा कोणाला लाथ मारू नये.
झोपेत श्वासोच्छवास आणि हलक्या घामावाटे आपल्या शरीरातील सुमारे अर्धा ते एक लिटर पाणी कमी होते. म्हणूनच सकाळी उठल्यावर आपल्याला तहान लागते.
गाढ झोपेत आपला मेंदू स्वतःची साफसफाई करतो. ही सफाई झाली नाही, तर विसरभोळेपणासारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच डोकं तल्लख ठेवण्यासाठी पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.
झोपेत आपल्याला वासाची जाणीव होत नाही. कितीही तीव्र वास असला तरी आपली झोप सहजासहजी उडत नाही. म्हणूनच आगीची सूचना मिळण्यासाठी घरांमध्ये 'स्मोक अलार्म' लावणे गरजेचे असते, कारण वासाने आपण जागे होऊ शकत नाही.
कधीकधी झोपताना अचानक आपण कुठूनतरी पडतोय असे वाटते आणि धक्का बसून जाग येते. याला 'हिपनिक जर्क' म्हणतात. जेव्हा स्नायू खूप लवकर रिलॅक्स होतात, तेव्हा मेंदूला वाटते की शरीर पडत आहे आणि तो तुम्हाला वाचवण्यासाठी झटकन जागे करतो.
स्वप्न पडत असताना बंद पापण्यांच्या मागे डोळे वेगाने इकडे-तिकडे हलतात. शास्त्रज्ञांच्या मते, यावेळी आपला मेंदू स्वप्नातील दृश्ये एखाद्या चित्रपटासारखी पाहत असतो.