अभ्यासात एकाग्रता हवीय? डुलकी टाळण्यासाठी 'या' टिप्स वापरा

पुढारी वृत्तसेवा

अभ्‍यास करताना मन एकाग्र होणे हे शैक्षणिक यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

दिवसभर चांगला अभ्‍यास होण्‍यासाठी रात्री सात ते आठ तास शांत झोप आवश्‍यक आहे.

अभ्‍यास करण्‍यासाठी घरात किंवा अभ्‍यासिकेत चांगला प्रकाश येणारी जागा ठरवा. नैसर्गिक प्रकाशात अभ्यास केल्याने झोप येत नाही.

अभ्‍यास करता झोप येत असेल तर काही वेळ मोठ्याने वाचा किंवा दुसर्‍याला विषय समजवून सांगा.

अभ्‍यास सलग करु नका. साधारण ३० ते ४५ मिनिटांनंतर ब्रेक घ्‍या. थोडी पावले चाला किंवा शरीराला स्‍ट्रेच करा. यामुळेही गुंगी जाते.

पुरेसे पाणी प्‍या. शरीर हायड्रेटेड असेल तर कमी थकवा जाणवतो.

खूप आरामदायी अवस्‍येत अभ्‍यासाला बसू नका. यामुळे झोप येवू शकते.

खूपच झोप येत असेल तर सौम्य संगीत ऐका. यामुळे एकाग्रता वाढण्‍यास मदत होते.

नियमित व्‍यायाम करा. शरीर निरोगी असेल तर मनही सतर्क राहते.

पोषक आहार घ्‍या अति खावू नका. पोट जड असताना केलेले अभ्‍यास झाेपेला निमंत्रण देताे. 

येथे क्‍लिक करा