पुढारी वृत्तसेवा
सावधान! घरातील 'काळे फंगस' आहे जीवघेणा धोका
फंगस म्हणजे काय?
ओल्या आणि दमट भिंतींवर दिसणारे काळे डाग म्हणजे बुरशी (Mold) होय.
या बुरशीला (Stachybotrys Chartarum) म्हणतात; ही विषारी (Toxic) असू शकते.
फुफ्फुसांचा धोका:
फंगसचे सूक्ष्म बीजाणू श्वासातून जातात; यामुळे दमा आणि ऍलर्जी वाढते.
लहान मुलांसाठी संकट:
मुलांची रोगप्रतिकारशक्ती नाजूक असते, त्यांच्यासाठी हा धोका सर्वात मोठा आहे.
त्वचेचे आणि डोळ्यांचे त्रास:
फंगसमुळे डोळ्यांची जळजळ आणि त्वचेवर खाज/पुरळ येऊ शकते.
मानसिक परिणाम:
सततचा थकवा, डोकेदुखी आणि चिडचिड होणे हेही याचे लक्षण आहे.
उपाय १: व्हेंटिलेशन: घरात हवा खेळती (Ventilation) ठेवा आणि दमटपणा टाळा.
उपाय २: स्वच्छता: बुरशी आलेल्या जागेवर ब्लिच किंवा व्हिनेगर लावून घासून स्वच्छ करा.
ओल लगेच थांबवा! दुर्लक्ष केल्यास तुमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात येईल.