पुढारी वृत्तसेवा
चालणे हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि मोफत मार्ग आहे, पण काही चुकीच्या सवयींमुळे वजन घटणे थांबते.
रोज चालल्याने केवळ कॅलरीज बर्न होत नाहीत, तर हृदय निरोगी राहून रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
केवळ चालणे पुरेसे नाही; वजन कमी करण्यासाठी योग्य झोप, आहार आणि दिवसभरातील हालचालीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.
एकाच संथ गतीने चालल्यास वजन घटणे थांबते. कॅलरीज बर्न करण्यासाठी मध्येच हळू तर मध्येच वेगाने चाला.
फक्त १० मिनिटांच्या वॉकिंगने वजन कमी होणार नाही. दररोज ५ ते १० मिनिटे वेळ वाढवून चालणे आव्हानात्मक करा.
आठवड्यातून फक्त १-२ दिवस चालणे निरुपयोगी ठरते. वजन घटवण्यासाठी रोजच्या वेळापत्रकात चालण्याची वेळ निश्चित करा.
सकाळी चालून आल्यानंतर दिवसभर बसून राहू नका. दिवसभरात शक्य तिथे चालत जाऊन स्वतःला सक्रिय ठेवा.
चालण्यासोबतच आहारात जास्त कॅलरीज घेत असाल तर वजन कमी होणार नाही. डाएटमधून कॅलरीजचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.
चालताना खांदे रिलॅक्स, मान सरळ आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. हात नैसर्गिकरीत्या पुढे-मागे हलवून चाला.