पुढारी वृत्तसेवा
कुळीथ लाल, पांढऱ्या आणि काळ्या अशा तीन प्रकारात आढळते. याची वाफवून केलेली उसळ अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक असते.
कुळीथामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लोह, फॉस्फरस तसेच जीवनसत्त्व 'ए' आणि 'बी' मुबलक प्रमाणात असते.
रोज रात्री पाण्यात भिजवलेले काळे कुळीथ सकाळी चोळून, गाळून २-४ महिने प्यायल्याने मुतखड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
स्थूलता कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त मेद विरघळवण्यासाठी कुळीथाचे सेवन अत्यंत हितावह मानले जाते.
मासिक पाळीच्या तक्रारींवर आणि गर्भाशयाच्या शुद्धीसाठी कुळीथाचा काढा ५ ते ७ दिवस घेणे अत्यंत फायदेशीर ठरते.
कुळीथाची डाळ वाफवून त्याची भाजी किंवा उकडलेले सार भातासोबत खाल्ल्याने पोटाचे विकार आणि वायूचा त्रास दूर होतो.
हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी कुळीथाचे पीठ आणि मूळव्याधाच्या रुग्णांसाठी कुळीथाची राब गुणकारी आहे.
कुळीथाच्या पानाच्या रसात कात मिसळून प्यायल्याने अतिसार थांबतो.
युनानी शास्त्रानुसार कुळीथ हे भूक वाढवणारे, कफ व मूळव्याध दूर करणारे आणि यकृत विकारांवर अत्यंत गुणकारी औषध मानले जाते.