Chicken Mutton During Illness: आजारी असताना चिकन-मटण खावं का?

पुढारी वृत्तसेवा

आजारी असताना चिकन-मटण खाणं योग्य की अयोग्य?

ताप, सर्दी, खोकला किंवा पोटदुखी असताना मांसाहार करावा का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

आजारपणात शरीराला प्रथिनांची गरज असते

आजारी असताना शरीर कमकुवत होतं. अशावेळी प्रथिने शरीराला ऊर्जा देतात आणि लवकर बरं होण्यास मदत करतात.

ताप, सर्दी आणि खोकला असताना चिकन चालतं का?

होय. अशा वेळी हलकं आणि कमी मसाल्याचं चिकन सूप किंवा उकडलेलं चिकन खाणं फायदेशीर ठरू शकतं.

चिकन सूपचे फायदे

गरम चिकन सूप गळ्याला आराम देतं, शरीर हायड्रेट ठेवतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.

मटण खायचं असेल तर काय खावं?

मटणाच्या रस्स्याऐवजी 'पाया सूप' किंवा हलकं शिजवलेलं मटण सूप अधिक फायदेशीर मानलं जातं.

पोट बिघडलं असेल तर चिकन-मटण टाळा

जुलाब, उलट्या, अपचन किंवा टायफॉइडसारख्या आजारांमध्ये मांसाहार टाळणे योग्य आहे.

टायफॉइडमध्ये मांसाहार का टाळावा?

टायफॉइडमध्ये पचनसंस्था कमकुवत असते. त्यामुळे चिकन किंवा मटण पचायला त्रास होऊन प्रकृती आणखी बिघडू शकते.

मसालेदार आणि तळलेले पदार्थ नकोत

आजारी असताना चिकन फ्राय, तिखट रस्सा किंवा तेलकट मटण खाणे टाळा. यामुळे पचनावर ताण येतो.

मांस पूर्णपणे शिजलेलं असावं

अर्धवट शिजलेलं चिकन किंवा मटण खाल्ल्यास फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. नेहमी व्यवस्थित शिजवलेले पदार्थच खा.

रात्री मांसाहार टाळा

आजारपणात रात्रीच्या वेळी चिकन-मटण खाणं टाळावं. हलकं, कमी मसाल्याचं आणि सहज पचणारं अन्न अधिक फायदेशीर ठरतं.

टीप

कोणताही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार घ्या.

चिकनप्रेमींनो सावधान! चिकनचे 'हे' 10 भाग चुकूनही खाऊ नका; अन्यथा...

Chicken | Pudhari
येथे क्लिक करा