अमृता चौगुले
आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. पण या विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती काय?
मराठी विश्वकोशमधील माहितीनुसार दूर रानावनात असलेल्या जागेला ‘विष्ठल’ म्हणतात.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते विठ्ठल हा शब्द तिथूनच आला असावा. म्हणजेच रानावनात असलेला देव.
विष्णूचे विट्टू आणि त्याला प्रेमाने ल प्रत्यय लावला तर विठ्ठल, असा दावा शब्दमणिदर्पणातील 32 व्या सूत्राचा आधार घेऊन केला जातो.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात इटु, इठूबा, इटूबा, असा देखील उच्चर केला जातो.
विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह् णाति) म्हणजे ‘अज्ञ जनांना ज्ञानाने स्विकारणारा, तो विठ्ठल’.
विठ्ठलाच्या मूर्तीला योगमूर्ती म्हटले जाते. समचरण पाय असलेली, ताठ मान, कमरेवर हात आणि दृष्टी चरणावर आहे.
डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात कमळ आहे, हे योगाचे लक्षण सांगितले आहे.