वारकरी संप्रदायचा मंत्र आहे राम कृष्ण हरी.यातील राम हे विष्णूच्या अवतारासाठी वापरले जाते.कृष्ण हे देखील विष्णूच्या अवतारासाठी वापरले जाते.तर हरी म्हणजे निराकार रूप. राम आणि कृष्ण हे सगुण रूपात पूजले जातात.त्यामुळे हरी हा शब्द निर्गुण रुपासाठी वापरला जातो.वारकरी संप्रदाय ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपांची पूजा करतो. .त्यामुळेच भेटताना किंवा निरोप घेताना राम कृष्ण हरी म्हणायची पद्धत रूढ झाली.सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांचा संगम या अभिवादनातून साधला जातो