पुढारी वृत्तसेवा
फुफ्फुसासाठी व श्वासाच्या त्रासावर ५ महत्त्वाची विटामिन्स अत्यंत फायदेशीर आहेत
व्हिटॅमिन डी श्वसन संस्था व प्रतिकारशक्ती मजबूत करून इन्फेक्शनचा धोका कमी करते.
सूर्यप्रकाश व योग्य आहारातून शरीराला नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी मिळू शकते.
व्हिटॅमिन सी - शरीरातील ऑक्सीडेटिव्ह ताण कमी करत इन्फेक्शन कमी करते.
आवळा, पेरू, संत्रा आणि लिंबूमधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते.
व्हिटॅमिन ए - फुफ्फुसांच्या पेशींच्या विकासात, श्वसन ऊतींचे रक्षण करते.
व्हिटॅमिन ए कमतरतेमुळे श्वसनाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
व्हिटॅमिन ई -फॅट-सॉल्युबल अँटिऑक्सिडेंट असून, ते पेशींना ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून वाचवते.
प्रदूषण, स्मोकिंग, केमिकल्समुळे फुफ्फुसांवर होणाऱ्या परिणामांपासून व्हिटॅमिन ई रक्षण करते.
बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स लाल रक्तपेशी बनवून संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवतात.
श्वास घेताना त्रास जाणवल्यास स्वतःहून उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या