Vitamin D deficiency symptoms | तुमच्‍या शरीरात व्‍हिटॅमिन डीची कमतरता आहे? शरीरच सांगते 'ही' लक्षणे

पुढारी वृत्तसेवा

शरीरात सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या डी जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्‍यास शरीर कोणते लक्षणे दाखवते हे जाणून घेवूया...

रात्री पुरेशी आणि शांत झोप घेऊनही जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे प्रमुख लक्षण असू शकते.

हाडांमधील विशेषतः कंबरेच्या खालच्या भागात आणि हाडांमध्ये वारंवार वेदना होणे हे व्हिटॅमिन डी कमी झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

तुम्ही वारंवार आजारी पडत असाल किंवा संसर्गजन्य आजार तुम्हाला लवकर ग्रासत असतील, तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली असून त्याला व्हिटॅमिन डीची गरज आहे.

शरीरात सतत अस्पष्ट वेदना होणे आणि स्नायूंमध्ये ताकद न जाणवणे, ही या जीवनसत्त्वाच्या अभावाची लक्षणे आहेत.

शरीराला झालेली एखादी जखम अपेक्षेपेक्षा जास्त काळ बरी होत नसेल, तर रक्तातील व्हिटॅमिन डी तपासून घेणे फायद्याचे ठरते.

सतत निराश वाटणे, मूड बदलणे किंवा सौम्य नैराश्याची भावना येणे याचा थेट संबंध व्हिटॅमिन डीच्या कमतरतेशी असू शकतो.

केस अचानक पातळ होणे किंवा मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू होणे, हे शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेचे लक्षण आहे.

हाडांची घनता कमी झाल्यामुळे किरकोळ दुखापत किंवा धक्क्यानेही हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

आहारात किंवा व्यायामात बदल न करताही जर तुमचे वजन अचानक वाढत असेल, तर त्याला व्हिटॅमिन डीची कमतरता कारणीभूत असू शकते.

येथे क्‍लिक करा.