पुढारी वृत्तसेवा
वास्तुशास्त्रानुसार काही वनस्पती केवळ घराची शोभा वाढवत नाहीत, तर त्या समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. रबर प्लांट ही त्यापैकीच एक वनस्पती आहे.
तुमच्या आयुष्यातील कठीण काळ दूर करून नशीब उजळवण्याची ताकद रबर प्लांटमध्ये असल्याचे वास्तुशास्त्र सांगते. हे रोप घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, रबर प्लांट हे केवळ शोभेचे झाड नसून ते प्रगती आणि भाग्योदयाचे एक प्रभावी माध्यम मानले जाते.
या वनस्पतीची पाने गोलाकार आणि जाड असतात, जी 'नाण्यांचे' प्रतीक मानली जातात. शास्त्रानुसार, ही पाने जशी बहरतात, तशीच तुमच्या घरात संपत्तीची वाढ होत राहते.
जर तुम्ही सततच्या आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल, तर हे रोप सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करते.
घराच्या आग्नेय (South-East) दिशेला रबर प्लांट ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते. या दिशेला रोप लावल्यास उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात, अशी मान्यता आहे.
केवळ घरातच नव्हे, तर ऑफिस डेस्क किंवा केबिनच्या आग्नेय कोपऱ्यात हे रोप ठेवल्यास कामात यश मिळते आणि पदोन्नतीचे योग जुळून येतात.
जर आग्नेय दिशेला जागा नसेल, तर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही हे रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला देखील ठेवू शकता. या दिशा देखील सकारात्मक फल देणाऱ्या ठरतात.
रबर प्लांट पुरेसा नैसर्गिक प्रकाश असेल अशा ठिकाणी ठेवा. मात्र, त्यावर यावर थेट प्रखर सूर्यप्रकाश पडू नये, अन्यथा पानांचे नुकसान होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार, रबर प्लांट कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघरात ठेवू नये. अशा ठिकाणी हे रोप ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञ किंवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा.