Healthy Habits : प्रतिकारशक्ती वाढवायची आहे? आहारात व्हिटॅमिन सीयुक्त फळांचा समावेश करा
पुढारी वृत्तसेवा
रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी (जीवनसत्त्व 'क') अत्यंत महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली ‘ही’ सहा फळे आपल्या आहारात समाविष्ट करून आपण आपली राेग प्रतिकारशक्ती वाढवू शकताे.
संत्रं हे जीवनसत्त्व ‘क’ चा एक उत्कृष्ट आणि पारंपरिक स्रोत आहे. संत्र्यामधील अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
किवी हे जीवनसत्त्व ‘क’, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे. किवीचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारते.
स्ट्रॉबेरीमध्ये जीवनसत्त्व ‘क’ आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील सूज कमी हाेण्यासही मदत हाेते.
पेरूमध्ये अनेक लिंबूवर्गीय फळांपेक्षा अधिक प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असते. पेरूमधील उच्च फायबर हृदय व पचनसंस्थेच्या आरोग्यास उपयुक्त ठरते.
पपई हे जीवनसत्त्व ‘क’ आणि पचनास मदत करणारे एन्झाइम्स असलेले फळ आहे. पपई अँटीऑक्सिडंट्सचे संरक्षण वाढवते.
अननस हे जीवनसत्त्व ‘क’ने समृद्ध आहे. याचे सेवनाने आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते.
टीप : वरील माहिती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
येथे क्लिक करा.