Vastu tips : घराच्या वायव्य दिशेला 'या' वस्तू ठेवू नका
पुढारी वृत्तसेवा
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मधोमध असलेल्या कोनाला वायव्य दिशा म्हणतात.
वास्तुशास्त्रात वायव्य दिशा खूप खास मानली जाते. हे स्थान वायुशी संबंधित असल्यामुळे या जागेत हवा खेळती राहणे आवश्यक आहे.
वायव्य कोनात मंदिर किंवा देवघर ठेवू नये.
वायव्य दिशेला जड सामान ठेवल्यास करिअर आणि व्यवसायात प्रगती थांबण्याची शक्यता असते.
वायव्य दिशेला पाण्याची टाकी असेल तर बचत करणे कठीण जाते. अनावश्यक खर्च वाढतो.
घराचा वायव्य कोपरा वाढलेला असेल, तर शत्रूंची संख्या वाढते आणि जीवनात तणाव निर्माण होतो.
या दिशेला तिजोरी ठेवल्यास उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होतो. कर्जाला सामोरे जावे लागते. तिजोरी नेहमी ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवावी.
वायव्य दिशेला लाल किंवा काळा रंग असल्यास वायू तत्त्व असंतुलित होते. यामुळे जीवनात चढ-उतार येतात.
वायव्य कोनात घरातील कर्ता पुरुषाची बेडरूम असल्यास त्याच्या जीवनात स्थिरता राहत नाही.
टीप: वरील माहिती वास्तूशास्त्रातील सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
येथे क्लिक करा.