पुढारी वृत्तसेवा
व्हिटॅमिन सी मुळे शाकाहारी अन्नातील लोह शरीर सहजपणे शोषून घेऊ शकते.
लिंबूवर्गीय फळे: संत्री आणि लिंबू शरीराला अन्नातून जास्त लोह शोषण्यास मदत करतात.
पेरूमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असते, जे लोहाचे प्रमाण वाढवते.
आवळा: व्हिटॅमिन सी चा राजा! आवळा ताजा, ज्यूस किंवा चटणी स्वरूपात नक्की खा.
ढोबळी मिरची: लाल-पिवळ्या शिमला मिरचीचा सॅलडमध्ये वापर लोहाचे शोषण वाढवतो.
स्ट्रॉबेरी: यात व्हिटॅमिन सी आणि फायबर असते, जे लोहाचा वापर सोपा करते.
किवी: नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! किवी वनस्पतीजन्य पदार्थांमधील लोह शोषून घेते.
टोमॅटो: रोजच्या जेवणात, सूप किंवा सॅलडमध्ये टोमॅटो वापरून लोहाचे प्रमाण वाढवा.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.