Weight Loss Research |आठवड्यातील फक्त ७५ मिनिटांच्‍या व्‍यायामाने कमी करा वजन! जाणून घ्‍या नवीन रिसर्च

पुढारी वृत्तसेवा

हाँगकाँग विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ' मधील शास्त्रज्ञांनी नव्या संशोधनातून वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग सांगितला आहे.

हा अभ्यास हाँगकाँगमधील पोटावर चरबी असलेल्या ३१५ प्रौढ व्यक्तींवर करण्यात आला. सहभागी लोकांना तीन वेगवेगळ्या कालावधीमध्‍ये व्‍यायाम करण्‍यास सांगितले.

'नेचर कम्युनिकेशन्स' नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनात म्‍हटलं आहे की, आठवड्यात ७५ मिनिटे "इंटरमिटंट ब्रिस्क वॉकिंग" केल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते .

Walking After Meals | Canva Photo

'इंटरव्हल ट्रेनिंग' म्हणजे थोड्या वेळासाठी वेगाने व्यायाम करणे (जसे की खूप वेगाने चालणे) आणि त्यानंतर काही वेळ हळू चालणे.

Walking After Meals | Canva Photo

थेट आणि संथ गतीने चालण्यापेक्षा, या पद्धतीमुळे व्हिसरल फॅट (शरीराच्या अंतर्गत अवयवांभोवती जमा होणारी घातक चरबी) खूप वेगाने बर्न होते.

Belly fat loss | Pinterest

शास्त्रज्ञांच्या मते, आठवड्यातून फक्त ७५ मिनिटे केलेला व्यायाम पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो.

नोकरी, अभ्यास किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे रोज जिममध्ये जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

(Canva Photo)

नवीन संशोधनातील निष्कर्ष 'आठवड्याचा संपूर्ण व्यायाम सुट्टीच्या १ किंवा २ दिवसांतच (विकेंड वॉरियर्स') करणार्‍यांचे समर्थन करतात.

रिसर्च टीमचे प्राध्‍यापक पार्को सिउ मिंग-फाय म्हणतात, वजन कमी करण्‍यासाठी व्यायाम रोज करण्यापेक्षा तो किती प्रभावीपणे आणि एकूण किती वेळ केला जातो, हे जास्त महत्त्वाचे आहे.

Canva
येथे क्‍लिक करा.