पुढारी वृत्तसेवा
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली नवा विश्वविक्रम रचण्यापासून केवळ २५ धावा दूर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा पूर्ण करण्यासाठी कोहलीला २५ धावांची गरज आहे.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २८ हजार धावा करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरु शकतो.
विराट कोहली ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ हजारांपेक्षा अधिक धावा आहे.
आता सचिन आणि संगकारानंतर असा पराक्रम करणारा कोहली केवळ तिसरा फलंदाज ठरेल.
विराट न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे.
न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका ११ जानेवारी रोजी वडोदरा येथे सुरू होणार आहे.