विराट कोहली अनुष्काला घट्ट मिठी मारून रडला

मोहन कारंडे

आरसीबीने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीची सर्वत्र चर्चा होत आहे.

विजयानंतर मैदानावर भावुक होण्यापासून ते पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारून रडण्यापर्यंत, विराट-अनुष्काचा प्रत्येक क्षण व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला.

१८ वर्षांनी पहील्यांदा आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर विराट कोहली मैदानावर खूप भावनिक झाला होता.

पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला मिठी मारली आणि त्याला अश्रू अनावर झाले.

१८ वर्षांपासून या आयपीएल विजयाची वाट पाहणाऱ्या विराट कोहलीसाठी हा एक भावनिक क्षण होता.

विजयानंतर विराटने सांगितलं की,"हा विजय त्याच्यासाठी खूप महत्वाचा होता."

विराट आणि आरसीबीच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विराट-अनुष्का जेतेपद जिंकल्यानंतर त्यांच्या घरी परतले आहेत.

सायकल चालवा आणि औषधं विसरा! हे आहेत १० आरोग्यदायी फायदे