World Bicycle Day 2025 | सायकल चालवा आणि औषधं विसरा! हे आहेत १० आरोग्यदायी फायदे

मोहन कारंडे

नियमित सायकलिंगमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, बीपी आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

सायकल चालवताना सांध्यांवर जास्त ताण येत नाही, त्यामुळे कोणत्याही वयात हा व्यायाम सोपा आहे.

सायकल चालवताना कॅलरी मोठ्या प्रमाणात बर्न होतात – वजन कमी करायचं असेल तर उत्तम उपाय!

स्वच्छ हवेत सायकल चालवल्याने श्वसनसंस्था मजबूत होते आणि फुफ्फुसांची क्षमता वाढते.

सायकल चालवताना निसर्गाशी जोडल्यासारखं वाटतं – तणाव, डिप्रेशन, चिंता कमी होतात.

नियमित सायकलिंगमुळे शरीर दमते, परिणामी गाढ आणि सुसंगत झोप लागते.

सायकल चालवण्यामुळे अंतर्गत अवयव सक्रिय होतात, त्यामुळे पचन सुधारते.

सायकलिंग हा एक असा व्यायाम आहे जो पाय, पाठीचा कणा, हात, आणि हृदय – सर्व भाग सक्रिय ठेवतो.

सायकल चालवल्याने शरीरातली इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते.

दरवर्षी ३ जून जगभरात 'जागतिक सायकल दिन' म्हणून साजरा केला जातो.

ही आहेत लक्षणे प्री-डायबेटीकची