विराटसोबत लग्नाआधी अनुष्काची अट काय होती? ७ वर्षांनी फोटोग्राफरचा खुलासा
पुढारी वृत्तसेवा
२०१७ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. टस्कनीमधील या स्वप्नवत लग्नाचे फोटो आजही ताजे वाटतात.
Virat Kohli-Anushka Sharma
पण या फोटोंमागे एक मोठी अट होती. ७ वर्षांनंतर या लग्नाचे फोटोग्राफर जोसेफ राधिक यांनी अनुष्काची अट सांगितली.
Virat Kohli-Anushka Sharma
जोसेफ सांगतात, "लग्नाआधी अनुष्काने मला फक्त एकच गोष्ट सांगितली होती - 'फोटो खरे वाटले पाहिजेत."
Virat Kohli-Anushka Sharma
जोसेफ सांगतात की, "विराट-अनुष्काच्या लग्नातील एकही फोटो रिटच केलेला नाही. तुम्ही त्यांच्या डोळ्यांच्या कडेला असलेल्या सुरकुत्याही स्पष्ट पाहू शकता. सर्व काही नैसर्गिक आणि खरं होतं."
Virat Kohli-Anushka Sharma
जेव्हा जोसेफ यांना त्यांच्या सर्वात आवडत्या फोटोबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी विराटने अनुष्काच्या कपाळावर किस करतानाचा फोटो आवडता असल्याचे सांगितले.
Virat Kohli-Anushka Sharma
आपले फोटो व्हायरल झाल्यावर काय वाटलं? यावर जोसेफ म्हणाले, "मी खूप आनंदी होतो! माझे फोटो सलूनमध्ये, रिक्षाच्या मागे आणि फटाक्यांच्या बॉक्सवर पाहून मला खूप भारी वाटलं."
Virat Kohli-Anushka Sharma
"ते दोघे इतके आनंदी होते की त्यांच्या आजूबाजूला 'स्टार' असल्यासारखं काहीच वाटलं नाही. त्यामुळे मला त्यांचं फोटो काढताना अजिबात दडपण आलं नाही," असं जोसेफ सांगतात.
Virat Kohli-Anushka Sharma
विकी कौशल-कतरिना कैफपासून ते प्रियांका चोप्रा-निक जोनासपर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो जोसेफ यांनी काढले आहेत.
Virat Kohli-Anushka Sharma
सध्या विराट आणि अनुष्का लंडनमध्ये वेळ घालवत आहेत.
Virat Kohli-Anushka Sharma
चर्चा आहे की, आपली मुलं वामिका आणि अकाय यांना लाइमलाइटपासून दूर ठेवण्यासाठी ते लंडनला स्थायिक होण्याचा विचार करत आहेत.