झी मराठीवर 'कमळी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.कमळीच्या व्हायरल झालेल्या शिवस्तुतीच्या प्रोमोची चर्चा होत आहे .कमळीची भूमिका अभिनेत्री विजया बाबरने साकारलीय .तिने याआधी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकेत काम केलं आहे .जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते .विजयाने कमळी मालिकेचा प्रोमो शूट करतानाचा अनुभव सांगितला .ती म्हणाली, 'ढोल- ताशा पथकवाले शिवस्तुती म्हणायचे मला ते खूप आवडायचं' .'कमळी' च्या निमित्ताने मला शिवस्तुती पाठांतर करायला मिळाले' .'खूप अभिमान आहे याचा की, मला महाराजांची शिवस्तुती पाठ आहे' .'याची प्रक्रिया कठीण होती, पाठांतर करायला २ दिवस लागले' .'या दरम्यान मी सतत शिवस्तुती ऐकत होते. माझ्यासाठी हे एक आव्हान होतं' .'कारण योग्य उच्चार आणि वेळेत ते पूर्ण करायचं होतं' .'सेटवर सर्वांनाच तो सीन आवडला. आम्ही पूर्ण दिवस शूट केलं' .'माझा शिवस्तुतीचा जो भाग होता तो डे-लाईट जाण्याच्या आधीच शूट करायचा होता तेही आव्हान होतं"'.'वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे'... व्हाईट वेस्टर्न लूकमध्ये 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे