स्वालिया न. शिकलगार
पोरी पिंगा गं पिंगा फेम तेजा अर्थातच विदिशा म्हसकर सर्वांनाच माहिती आहे
मालिकेत स्पष्टवक्ती, हुशार, नोकरीमध्ये स्ट्रगल करणारी तेजा आपण पाहिलीच आहे
रिअल लाईफमध्येही ती स्ट्रगल करणारी अभिनेत्री आहे
एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, मुंबईत तिने ६ घरे बदलली आहेत
घर मालकाने रुम सोडायला सांगितल्यानंतर तिला सामान शिफ्टींगचं प्रचंड टेन्शन यायचं
गोरेगावमध्ये दोन वर्ष एका मैत्रीणीसोबत राहिली होती
त्यावेळी तिच्या मैत्रीणीने मुंबई काय आहे, हे सांगितलं होतं
मुंबईत कसं टिकून राहिलं पाहिजे हे मुंबईने शिकवल्याचेही ती म्हणते
तुमची स्वप्ने कधी संपले नाही पाहिजे, असेही ती सांगते
मुंबईत राहिल्यामुळे ट्रॅव्हलिंगची आवड लागल्याचे तिने सांगितलं होतं