Namdev Gharal
Shanghai पासून सुमारे 60 किमी अंतरावर एक संपूर्ण गाव पाण्याच्याकडेला वसलेले आहे
Zhouzhuang झोंगझुंग हे चीनमधील सर्वात प्रसिद्ध वॉटर टाऊन आहे. याला "चीनचं व्हेनिस" असंही म्हटलं जातं.
येथील लोक कालव्यांच्या जाळ्यामुळे बोटीवरूनच गावातील प्रवास करतात, जसं इटलीतील व्हेनिसमध्ये होतं.
14 हून अधिक प्राचीन पूल गावात आहेत. दगडी पूल आणि लाकडी घरांचे पाण्यावर प्रतिबिंब परावर्तित होऊन एखादा निसर्गचित्रासारखं सौंदर्य निर्माण करतात.
झोंगझुंग येथील रहिवासी आणि पर्यटक दोन्ही गोंडोलासारख्या बोटीतून प्रवास करतात
बोट चालवणाऱ्या स्त्रिया कधी कधी लोकगीतेही गातात, ज्यामुळे या गावातील वातावरण अजून रम्य होतं.
या गावाला 900 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. साँग राजवंशाच्या (Song Dynasty) काळात हे गाव विकसित झालं.
ताजे मासे आणि पारंपरिक डुकराच्या मांसांची डिश हे याठिकाणचे वैशिष्ठ्यपूर्ण खाद्यपदार्थ आहेत.
स्थानिक लोक अजूनही पारंपरिक जीवनशैली पाळतात.रात्रीच्या वेळी गाव सुंदर रोषणाईमुळे अधिक आकर्षक दिसतं