Namdev Gharal
तुर्कीची देशातील इस्तांबूल शहर हे त्याच्या ऐतिहासिकपणासाठी जसे प्रसिद्ध आहे तसेच आणखी एका कारणासाठीही प्रसिद्ध आहे ते म्हणजे तेथील भटक्या कुत्र्यांसाठी
(No kill - No Capture) ‘नो किल - नो कॅप्चर’ या सरकारच्या पॉलिसीमुळे येथील भटक्या कुत्र्यांना संरक्षण आहे
या शहरात भटक्या कुत्र्यांना कोणही हटकत नाही किंवा हानी पोहचवली जात नाही, येथील नागरिकासारखेच त्यांनाही पूर्ण स्वातंत्र्य आहे.
आटोमन साम्राज्या पासून इंस्तांबूल शहरात कुत्र्यांना सन्मान दिला जातो तसेच येथील कुत्रेही शहराचे नियम मानले जाते
भूक लागली की हे कुत्रे बिनधास्त कोणत्याही दुकानदाराकडे जाऊन खायला मागतात, किंवा येथे येणारे पर्यटक त्यांना खायला देतात
अनेक वेळा थंडीच्या दिवसांत या भटक्या कुत्रांना पाघंरुण घालून त्यांचे संरक्षण केले जाते
तसेच सर्व कुत्रांचे व्हॅस्किन केले असते त्यामुळे त्यांच्यापासून होणारे रोग टाळले जातात
या शहरातील रहिवासी कुत्र्यांना सार्वजनिक मालमत्ता मानतात, त्यांना अन्न आणि पाणी पुरवतात आणि प्रेम आणि काळजी देखील देतात.
या शहरात जवळपास १ लाखाच्या भटकी कुत्री आहेत. असे एका आकडेवारीवरुन स्पष्ट होते
तसेच बस व मेट्रोमधून रोज फिरणार "बोजी" हा कुत्रा फार प्रसिद्ध आहे. प्रवाशांमध्ये तो फार लोकप्रिय झाला होता. लोक त्याच्यासोबत फोटो घेतात.
इस्तंबूलमधील लोक आणि कुत्र्यांमधील संबंधावर आधारित "स्ट्रे" हा एलिजाबेथ लो (Elizabeth Lo) या दिग्दर्शकाचा माहितीपट प्रदर्शित झाला आहे.