Namdev Gharal
वेलक्रो आज प्रत्येक ठिकाणी गरजेची गोष्ट आहे, कपडे, रेनकोट, टोपी, बेल्ट अशा अनेक गोष्टींसाठी Velcro खूप उपयुक्त ठरते
बटन किंवा नाडी सोडबांध करताना खूप वेळ लागतो यासाठी हे वेलक्रो खूप उपयुक्त ठरतात. सहज सोप्या पद्धतीने कोणतीही गोष्ट हवी तशी ॲडजस्ट करता येते
गोष्ट आहे 1941सालची स्विस अभियंता जॉर्ज डी मेस्ट्रल (George de Mestral) हे आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला गेला होता. त्यावेळी त्याच्या कपड्यावर व कुत्र्यांच्या केसांना एक वनस्पतीच्या बिया चिकटल्या होत्या
ती वनस्पती होती 'बर्डॉक' (Burdock) नावाच्या वनस्पतीच्या बिया. या बिया पाहून या इंजिनीअरच्या डोक्यात एक विचार चमकुन गेला
त्यांनी कुतूहलापोटी त्या बिया मायक्रोस्कोपखाली पाहिल्या. त्यांना दिसले की त्या बियांच्या टोकावर छोटे-छोटे 'हुक्स' होते. हे हुक्स कापडाच्या धाग्यांमध्ये किंवा केसांमध्ये घट्ट अडकत होते.
यावरूनच त्यांना 'हुक आणि लूप' (Hook and Loop) ही कल्पना सुचली. त्यांनी विचार केला की, जर आपण कृत्रिमरीत्या असे हुक्स आणि लूप तयार केले, तर दोन गोष्टी एकमेकांना सहज जोडता येतील.
ही कल्पना प्रत्यक्षात आणणे सोपे नव्हते. अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांनी नायलॉन (Nylon) चा वापर करून वेल्क्रो तयार केले. या शोधाला पूर्ण रूप देण्यासाठी त्यांना तब्बल १० वर्षे लागली आणि १९५५ मध्ये त्यांनी याचे पेटंट मिळवले.
'Velcro' हा शब्द दोन फ्रेंच शब्दांपासून बनला आहे: Velours म्हणजे (मखमल/Velvet) व Crochet (हुक/Hook)
सुरुवातीला वेल्क्रोला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, जेव्हा नासाने (NASA) अंतराळवीरांच्या कपड्यांसाठी आणि सामानासाठी याचा वापर सुरू केला, तेव्हा वेल्क्रो जगभरात प्रसिद्ध झाले.
बर्डॉकच्या बिया (Burdock Seeds) पासून शोध लागलेला वेलक्रो आज जगभरात बूट, बॅगा, वैद्यकीय उपकरणे आणि अंतराळ मोहिमा यासाठी वापरला जातो.