Namdev Gharal
केवळ रडणे- हसणे आणि डोळयातून पाणी येणे म्हणजे अश्रू का? अश्रू येणे याचा संबध मानवी भावनांशी जरी जोडलेला असला तरी यामागे वैज्ञानिक कारण ही दडलेले आहे.
मुळात अश्रू डोळ्यांच्या कोणत्या भागात तयार होतात. व यापाठीमागे काय कारणं असते हे जाणून घेऊ
अश्रू हे शरिरातील लॅक्रीमल ग्रंथीमध्ये Lacrimal Glands तयार होतात. या ग्रंथी डोळयाच्या समोरच्याच भागावर असतात
तज्ञांच्या मते अश्रू 3 प्रकारचे असतात यामध्ये १ बेसल टिअर Basal Tear हे अश्रू नेहमी आपल्या डोळयातच राहतात व आपले डोळयांमध्ये ओलावा टिकून राहतो
दुसरे असतात Reflex Tear या अश्रूंचे काम म्हणजे माणसाच्या डोळ्यात जेंव्हा कचरा, धुळ किंवा तिखट जाते त्यावेळी डोळयांची सफाई करण्याचे काम यांचे असते
आणि तिसरे अश्रू म्हणजे Emotional Tear भावनिक अश्रू हे अश्रू, वेदना, दुख:, भिती, किंवा भावनांची उलथापालथ यामुळे येत असतात
हे emotional अश्रू सर्वात रहस्यमय असतात, या अश्रूंमध्ये स्ट्रेस हार्मोन्स व टॉक्सिन असतात जे आपोआप बाहेर पडतात
त्यामुळे अश्रू ज्यावेळी बाहेर पडतात. त्यावेळी मानसाच्या शरिराला व मनालाही हलके वाटते, तसेच ह्दयाची गतीही सामान्य होते.
यामुळे अश्रू येणे ही क्रिया शरिराची व मनाची सुरक्षा प्रणाली आहेत. अत्याधिक भावनांमुळे हे अश्रू वाहतात
पण अती अश्रू येणे काहीवेळी तुमच्यात तणाव, डिप्रेशन, मानसिक थकान याची लक्षणे असल्याचे दर्शविते