Asit Banage
कर्करोग हा जगातील सर्वात धोकादायक आजारांपैकी एक मानला जातो.
मात्र, आता या आजारापासून बचाव करण्यासाठी आहार किती महत्त्वाचा आहे, याबाबत शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
शाकाहार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.
‘युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड’च्या संशोधकांनी तब्बल 18 लाख लोकांच्या आरोग्याशी संबंधित डेटाचे सखोल विश्लेषण केले.
या अभ्यासात असे आढळले की, जे लोक मांसाहार टाळतात आणि शाकाहारी अन्नाला पसंती देतात, त्यांच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका इतरांच्या तुलनेत खूपच कमी असतो.
शाकाहारी लोकांमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोकाही 21 टक्क्यांनी कमी आढळला.
तसेच शाकाहारी पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 12 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले.
महिलांमध्ये शाकाहारी आहारामुळे बेस्ट कॅन्सरचा धोका 9 टक्क्यांनी कमी होतो.