पुढारी वृत्तसेवा
भेंडी (Okra)
भेंडीमध्ये विद्रव्य फायबर भरपूर असते. हे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करते.
गाजर
गाजरातील बीटा-कॅरोटीन आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.
पालक व हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी, चाकवत यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असते, जे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवते.
वांगी
वांग्यामध्ये नॅसुनिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तवाहिन्यांचे संरक्षण करते.
कोबी
कोबीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन C भरपूर असते, जे चरबीचे शोषण कमी करते.
टोमॅटो
टोमॅटोमधील लाइकोपीन कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका घटवतो.
दोडका व दुधी भोपळा
ही हलकी पचणारी भाज्या असून चरबी कमी ठेवण्यास मदत करतात.
कांदा आणि लसूण
कांदा व लसूण वाईट कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढवतात.
शिजवण्याची पद्धतही महत्त्वाची
भाज्या तळण्याऐवजी वाफवून, उकडून किंवा कमी तेलात शिजवाव्यात.