पुढारी वृत्तसेवा
डोळा फडफडणे म्हणजे काय?
डोळ्याच्या पापणीतील स्नायू अनियंत्रित हलणे म्हणजे डोळा फडफडणे (Eye Twitching).
ताणतणाव हे मुख्य कारण
अती तणाव, चिंता आणि मानसिक थकवा असल्यास डोळा फडफडण्याची शक्यता वाढते.
झोपेची कमतरता
पुरेशी झोप न झाल्यास डोळ्यांचे स्नायू थकतात आणि फडफड सुरू होते.
जास्त स्क्रीन टाइम
मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो.
कॅफिनचे अतिसेवन
जास्त चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्समुळेही डोळा फडफडतो.
शरीरातील पोषक घटकांची कमतरता
मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा व्हिटॅमिन B12 ची कमतरता कारणीभूत ठरू शकते.
आयुर्वेद व लोकसमजुती काय सांगतात?
पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ, डावा अशुभ मानला जातो.
स्त्रियांसाठी याच्या उलट समज आहे.
डॉक्टर काय सांगतात?
बहुतेक वेळा डोळा फडफडणे निरुपद्रवी असते आणि आपोआप थांबते.
कधी डॉक्टरांकडे जावे?
डोळा दीर्घकाळ फडफडत असेल, वेदना, सूज किंवा दृष्टी धूसर होत असेल तर तपासणी गरजेची.