पुढारी वृत्तसेवा
भाजी ताजी, टवटवीत आणि नैसर्गिक रंगाची आहे का, हे आधी तपासा.
फार चमकदार किंवा अतिशय मोठ्या आकाराची भाजी टाळा, ती रसायनांनी पिकवलेली असू शकते.
पानभाजीत पिवळेपणा, डाग किंवा किडींची चिन्हे नाहीत ना, याची खात्री करा.
भाजी दाबून पाहा; खूप मऊ किंवा फार कडक भाजी खरेदी करू नका.
हंगामी भाजी निवडा, ती चवीला चांगली आणि स्वस्तही असते.
भाजीवर पाणी शिंपडून जड केलेली तर नाही ना, हे लक्षात घ्या.
शक्यतो स्थानिक शेतकऱ्यांकडील किंवा विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच भाजी घ्या.
घरी आल्यानंतर भाजी नीट स्वच्छ धुवूनच वापरा, आरोग्य सुरक्षित राहते.