पुढारी वृत्तसेवा
पनीर फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा, यामुळे ते मऊ राहते.
जर तुम्ही पनीर पाण्यात ठेवत असाल, तर ते पाणी दररोज बदलणे विसरू नका जेणेकरून पनीरला वास येणार नाही.
पनीर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्याऐवजी एका ओल्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवल्यास ते जास्त काळ ताजे राहते.
पनीर कापल्यानंतर ते नेहमी एअरटाईट कंटेनरमध्ये (हवाबंद डब्यात) ठेवावे, जेणेकरून ते कडक होणार नाही.
पनीर चुकूनही फ्रीजरमध्ये ठेवू नका, अन्यथा त्यातील ओलावा निघून जातो आणि ते रबरासारखे चामट होते.
जर पनीर कडक झाले असेल, तर वापरण्यापूर्वी १०-१५ मिनिटे कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून त्यात पनीर ठेवा.
पनीर साठवताना पाण्यात थोडा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाकल्यास बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत होते.
शक्यतो गरजेनुसार ताजे पनीर खरेदी करा, परंतु साठवून ठेवायचे असल्यास वरील पद्धती नक्की वापरून पहा.