Raw jackfruit :‘व्हेज मटण’ म्हणून प्रसिद्ध कच्च्या फणसाचा असाही उपयोग, जबरदस्त फायदे पहाच!

Asit Banage

कच्च्या फणसाची भाजी चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानली जाते.

कच्च्या फणसामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते.

फायबर आणि कमी कॅलरीमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

कच्चा फणस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो. त्यामुळे मधुमेहींसाठी मर्यादित प्रमाणात तो उपयुक्त मानला जातो.

यात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

व्हिटॅमिन C आणि इतर पोषक घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते आणि केसांनाही पोषण मिळते.

कच्च्या फणसाची टेक्स्चर मांसासारखी असल्याने तो ‘व्हेज मटण’ म्हणूनही लोकप्रिय आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...