पुढारी वृत्तसेवा
दिवाळीच्या आनंददायी पर्वाची सुरुवात होते ती 'वसुबारस' म्हणजेच गोवत्स द्वादशीने. हा सण भारतीय संस्कृतीतील निसर्ग आणि पशुप्रेम दर्शवतो.
'वसु' म्हणजे संपत्ती, धन आणि बारस = द्वादशी (१२ वी तिथी). या दिवशी सवत्स (वासरासह) गाईची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार, गोमातेच्या शरीरात ३३ कोटी देवतांचा वास असतो. म्हणूनच गाईला साक्षात 'विश्वमाता' मानले गेले आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनादरम्यान उत्पन्न झालेली 'कामधेनू' गाय सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. तिचेच रूप म्हणूनही गोपूजा केली जाते.
कृषीप्रधान भारताची अर्थव्यवस्थेत गोवंशाचे योगदान अनन्यसाधारण आहे. शेतीत उपयोगी ठरणाऱ्या पशुधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
महिला गोमाता व वासराची पूजा करून मनोभावे प्रार्थना करतात.गोसेवेमुळे जीवनात सुख-समृद्धी नांदते असे मानले जाते.
पूजेच्या वेळी गाईला आणि वासराला गहू, मूग किंवा पुरणपोळीचा गोड नैवेद्य दिला जातो.
वसुबारस आपल्याला केवळ धार्मिक महत्त्वच शिकवत नाही, तर पर्यावरण आणि मुक प्राण्यांवर प्रेम करण्याचा मोलाचा संदेश देते.